Showing posts with label Life. Show all posts
Showing posts with label Life. Show all posts

Tuesday, 24 May 2022

जगायचं कुणासाठी...?

✍️जगायचं कुणासाठी...?

माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य  जगतो. पण.. आयुष्य का जगतो? कशासाठी जगतो? आणि कुणासाठी जगतो? याची मात्र काहीच कल्पना नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतो. पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो, लहान-सहान कामे करतो, अंगमेहनतिचीही कामे करतो. पूर्वी  80/90 वर्षांचे आयुष्य जगायचा, आता 60/70 वर्षे जगतो आणि मरून जातो. मेल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात. मेल्यानंतर पृथ्वीतलावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमचंच संपुष्टात येतं...आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त 10/15 दिवसांपुरतीच असते...  कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतंच. मी, माझं कुटुंब एवढंच जग असतं आपलं.. 

 *सुंदर असा लेख आहे.सर्वांनी आवश्य* *वाचावा धन्यवाद* .  मग...जगावं तरी कुणासाठी? ..

तर...जगावं तर ते समाजासाठी...  तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता? तुम्ही काय उभारता ? तुम्ही कुणाच्या तरी कामी येता का? यालाच तुमच करियर म्हणतात. तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात... करियर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा... समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय... 

*खूप पैसा, गाडी, बंगला, दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाही. चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो.  पैसा, गाडी, बंगला ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत... यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. सोबत नेता ते तुमचं कर्म, तुमच्याप्रति असलेली समाजाची आपुलकी, आणि वर्षानुवर्षे काढली जाणारी तुमची आठवण हिच आयुष्यभराची कमाई असते.*. 

आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही... पण समाजासाठी झटणारे साधु संत आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत. कारण ते जगले होते समाजासाठी. त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर त्यांच्या आठवणी जिवंत आहेत. उदाहरण घ्यायचच झाल तर  संत  गाडगेबाबा... काय होतं त्यांच्याकडे...  *फक्त हातात एक खराटा, डोक्यावर फुटलेल्या मडक्याच खापर आणि अंगावर फाटका सदरा...पैश्याचा तर विषयच नव्हता...चलनाचं एक नाणंसुद्धा खिशात नसायचं*. गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं. *पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची. याच विचारांमुळे आज ते अजरामर झाले.*

आपणही समाजात असं काही करतो का? समाजाला काही देतो का? भले नसेल आपली महती साधुसंतांएवढी कि लोक आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील. पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवेल एवढं कर्तुत्ववान व्हावं प्रत्येकाने 

*एकमेकांचा राग, द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं रहायला शिका.* 
ज्या कुटुंबासाठी आज जगतोय आपण, ज्या मुलांना लहानाचं मोठं करतोय...तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतीलच याची कुठलीही शाश्वती नाही... म्हातारे झाल्यावर आई-बाप  काहीच काम करत नाहीत म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेवून ठेवलं जातं...

बालपणासारखंच तुमचं म्हातारपणही जाईल असंही नाही. बालपणी लाड होतात तर म्हातारपणी हाल-अपेष्टाही सहन कराव्या लागतात. ज्या मुलांसाठी जगलो तीच मुले एका क्षणात परके करून जातील... या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो कि आपण आयुष्यभर जगलो ते कुणासाठी?....

*समाजासाठी जगा...*
*दान-धर्म करा, योग प्राणायम करा,ध्यान धारणा करा,भुकेल्या माणसांना अन्न द्या. आनंदात जगून घ्या... फिरावंस वाटलं तर भरपूर फिरून घ्या. म्हातारपणी फिरावंस वाटल तरी तुमच शरीर मात्र साथ देणार नाही म्हणून जोपर्यंत शरीर धडधाकट आहे तोपर्यंतच सर्व फिरून पाहून घ्या. येताना एकटे असलो तरी जाताना मात्र सर्वांचे होऊन जाण्यातच खरी मजा आहे.👏

Thursday, 21 November 2019

ज्यांचा जन्म १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८०, १९८१, १९८२, १९८३, १९८४, १९८५ साली झाला आहे खास त्या पिढी साठी हा लेख.

ज्यांचा जन्म १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८०, १९८१, १९८२, १९८३, १९८४, १९८५ साली झाला आहे खास त्या पिढी साठी हा लेख

ही पीढ़ी आता 35 ओलाडून 50 कडे चाललीय, 'हया' आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली.....

१,२,५,१०,२०,२५,५० पैसे बघीतलेली ही पीढीत पाहुणे कडून लाज न बाळगता पैसे घेत होती. शाई-बोरु/ पेन्सिल / पेन पासून सुरवात करून, ही पीढी आता, स्मार्ट फोन, लॕप्टाॕप, पीसी, उतारवयात सराईतपणे हाताळत आहे.

ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन, असलेली, पण आता ह्या उतारवयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी, अवखळ तर कधी गंभीर.... खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित....

टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्स्टर ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती.

मार्कशीट आणि टिव्ही च्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी.

कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन लहानपणी गाडी गाडी खेळणं यात त्यांना काहीही कमीपणा वाटला नव्हता.

'सळई जमिनीत रूतवत जाणं' हा काही खेळ असू शकतो का ? पण होता.

'कैऱ्या तोडणं' ही यांच्या साठी चोरी नव्हती, आणि
कुठल्याही वेळी कुणाचंही दार वाजवणं या मध्ये कसलेही एथीक्स तुटत नव्हते.

मित्राच्या आईने जेवू घालणं यात कसलाही उपकाराचा भाव आणि त्याच्या बाबांनी ओरडणं यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची पिढी.

वर्गात किवा शाळेत स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचरत बोलणारी ही पिढी.

दोन दिवस जरी मित्र
शाळेत नाही आला तर
शाळा सुटल्या सुटल्या
दप्तरासकट
त्याच्या घरापर्यंत जाणारी
ती पीढी..

कुणाचेही बाबा शाळेत
आले की..मित्र कुठेही
खेळत असो .सत्तरच्या स्पीड ने "तुझे बाबा आलेय चल लवकर"
ही बातमी मित्रापर्य॔त पोहोचविणारी ती पिढी

पण गल्लीत कुणाच्याही घरात कसलाही कार्यक्रम असलं तरी वाट्टेल ते काम कसलाही विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी.

कपील, सुनिल गावसकर , वेंकट, प्रसनाच्या बोलिंग वर आणि पेस, भूपती, स्टेफी ग्राफ, अग्गासी, सॕम्प्रसच्या टेनिस वर तर राज, देव, दिलीप ते राजेश,अमिताभ आणि धर्मेंद्र, जितेंद्र बरोबर नंतर बऱ्याच नवीन कलाकारांवर, अगदी आमिर, सलमान, शाहरुख माधुरी,अनिल वर वाढलेली ही पिढी

भाड्याने VCR आणुन ४-५ पिच्चर पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी.

लक्ष्या-अशोक च्या निर्व्याज विनोदावर हसलेली, नाना, ओम पुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गू दादा, वर्षा, सोनम, किमी ,सोनाली, हे कलाकार पाहिलेली पिढी.

कितीही शिकलं तरी 'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही' यावर विश्वास असणारी

'शिक्षकांचा मार खाणं' यात काहीही गैर नाही फक्त घरी कळू नये कारण 'घरात परत धुतात' ही भावना जपणारी पिढी.

ज्यांच्या शिक्षकांवर आवाज चढवला नाही अशी पिढी. हीत कितीही धुतलं तरी दसऱ्याला शिक्षकांना सोनं देणारी आणि आज इतक्या वर्षानी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता खाली वाकून नमस्कार करणारी पिढी. कॉलेज ला सुट्टी असली तर् आठवणीत स्वप्न रंगवनारी पिढी ...

ना मोबाईल ना SMS ना व्हाट्सअप .... भेटण्या साठी आतुरतेने वाट पाहणारी पीढ़ी.

पंकज उधासच्या _'तुने पैसा बहोत कमाया इस पैसेने देस छुडाया'_ या ओळीला डोळे पुसणारी,

दिवाळीच्या पाच दिवसांची कथा माहित असणारी

लिव्ह इन तर सोडाच, लव मॅरेज म्हणजे फार मोठं डेरिंग समजणारी ही पिढी, अहो शाळेत आणि महाविद्यालयात पण मुलींशी बोलणारी मुले ऍडव्हान्स समजली जाणारी पिढी.

पुन्हा डोळे झाकुया ?

दहा, वीस....... ऐंशी, नव्वद...........पुन्हा जुना आठवणीचा सुवर्ण काळ

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....असं न समजणारी सुज्ञ पिढी, कारण आजचे दिवस हेच उद्याच्या आठवणी असणार असं मानणारी ही पिढी ?

धन्य ते जीवन जे खर आपणच जगलोय !!!

सर्व मित्रांसाठी....✍🏻