Showing posts with label गावा कडचे दिवस. Show all posts

Tuesday, 11 February 2020

जमीन विकणाऱ्या माझ्या कोकणातील बांधवांनो जरा हे वाचा....

आपण  कोणी  2-4 लाख प्रति  एकर दराने जमीन विकत असाल तर त्याची प्रति चौरस फूट किंमत किती ? 

1 एकर म्हणजे 40 गुंठे आणि 33 फूट रुंद 33 फूट लांब म्हणजे 1 गुंठा. 33*33=1089 Sq. Feet म्हणजे 1 गुंठा.
अश्या प्रकारे 1089 गुणिले 40 = 43560 Sq. Feet म्हणजे 1 एकर.
बांधवांनो जर तुम्ही 2 लाख प्रति एकर दराने जमीन विकत असाल तर  प्रति Sq. Feet ची किंमत  200000/43560= 4 रु 59 पैसे एवढी किंमत मिळते, अश्या प्रकारे 3 लाख रुपये प्रति एकर दर असेल तर 1 Sq. Feet ची किंमत 6 रु. 89 पैसे. जर 4 लाख असेल तर 9 रु.18 पैसे असा दर मिळतो.

बांधवांनो जर तुम्ही घरात असलेली रद्दी  भंगाराच्या दुकानात घेऊन गेलात तर तिला 8 ते 10 रुपये प्रति किलो असा दर मिळतो. म्हणजे आपण रद्दी पेक्षा कमी दराने जमीन विकतोय हे लक्ष्यात घ्या.

आपली स्वतःची जमीन म्हणजे मालकी हक्क. जमीन म्हणजे स्वामित्व आणि हा आपण भंगारा पेक्षा कमी दराने विकतोय.

ईश्वराने कोकणाला भरभरून निसर्ग दिलेला आहे. नदी, नाले, दरी,खोरी, भरपूर पाऊस, हिरवीगार जंगले, नितांत सुंदर समुद्र किनारे, स्वच्छ हवा एवढी निसर्ग संपदा असून सुद्धा आपण जमीन पडीक आहे, उत्पन्न काही नाही म्हणून विकून टाकतो हा आपला नाकर्ते पणा आहे.
आज कोल्हापूर, सांगली, साताऱ्याचे शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत.शेडनेट, पॉलिहाऊस उभारून 10 ते 20 गुंठ्या मध्ये सुद्धा 2 आणि 3 लाखाचे उत्पन्न घेत आहेत. आणि आम्ही चार भावांचे पटत नाही. भावांच्या बायका हे झाड माझ्यात आणि हे झाड तुझ्यात अश्या भांडतात म्हणून जमीन विकतोय हा शुद्ध मूर्खपणा आहे.
आणि जर तुम्हाला कोणी दलाल काही सांगत असेल तर त्याचे मुळीच ऐकू नका कारण हे दलाल म्हणजे दोघांचे भाडं आणि तिसऱ्याचा लाभ उठवणारे माकड असतात. जसे दोन मांजरीचं लोण्याचा गोळ्या वरून भांडण होते आणि त्याचा फायदा माकड उठवतो.
म्हणून आपसात न भांडता शांत पणे सर्व भाऊ एकत्र बसून तिरसट पणे एकमेकांशी न बोलता व माथेफिरू सारखा न विचार करता शांतपणे, थोडा समजूतदारपणा दाखवून  थोडासा खर्च करून जमिनीचे विभाजन करून घ्यावे आणि भले पाच-दहा गुंठे का असेना आपल्या मुलांसाठी ठेऊन द्यावी.

आपणास माहीत आहेच की गोवा हायवे चे चौपदरीकरण पुढील 5-10 वर्षात पूर्ण होईल. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण पुढील 15-20 वर्षात पूर्ण होईल. सागरी महामार्ग पुढील 10-15 वर्षात पूर्ण होईल मग आपल्या मुलाबाळांना एखादा उद्योग, व्यवसाय, एखादा नवीन प्रयोग करावासा वाटला तर जमीन कुठून आणणार.
मग भंगाराच्या भावाने विकलेल्या जमिनीची आठवण येईल पण जमीन परत मिळणार नाही. एकदा जमीन विकली की ती हातातून गेली.

अजून एक मुद्दा आज सोलर पॉवर वर मोठमोठ्या कंपन्या संशोधन करत आहेत. आज लाख रुपयांना मिळणारे सोलर पंप काही  वर्षांनी 10-20 हजारात मिळतील मग प्रत्येक जमिनीमध्ये सोलर पंप लागेल.
अश्या प्रकारे आपण भंगाराच्या भावाने विकलेल्या जमिनीमध्ये काहीतरी चांगले करून तिथे सोने पिकवता येईल.
म्हणून भंगाराच्या भावाने जमीन विकताना दहा वेळा विचार.

Tuesday, 25 April 2017

काहि जुन्या पसुन नवीन

कळकाने 'यांटीना'हलवून दूरदर्शनच्या मुंग्या घालवण्याचे ब्ल्याकयांडव्हायीट दिवस संपले. मर्फीचा 'रिडीव' कानाला लावून दुश्मनाचा माग काढल्यासारखे केंद्र बदलण्याचे दिवस संपले. मम्बयवरनी 'टील्फून' येताच या टोकावरून त्या टोकाला कुत्र्यागत धापा टाकत पळत जाण्याचे दिवस संपले. स्टीलच्या हातभार लांब 'ब्याटरिकीत' चार चार 'मसाला' शेल टाकून गावाबाहेर शिकार करायला निघाल्यासारखे चिनपाट घेवून परसाकडला जायचे दिवस संपले. क्यासेटांच्या रिळाचे बंडल ज्वारीच्या ताटांना बांधून पाखरं राखायचे दिवस संपले. साठ 'हूलटेजच्या' 'फिलीपच्या' बलात घरभर उजेड पडण्याचे दिवस संपले. एकदा चावी पिळली कि दिवसभर नं थकता गरागरा  फिरणाऱ्या यचेमटी घड्याळाचे दिवस संपले.चुव्वीस नंबरच्या दोन रुपये भाड्याच्या 'याटलस' सायकलवर नळीवर बसून बाप नावाच्या माणसाबरोबर जत्रा खेत्रा करण्याचे दिवस संपले. बाराने तिकिटीत व्हीसीआरवर बच्चनचे सिनेमे पाहण्याचे दिवस संपले.

           तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.त्या अगोदर आमच्या आईबापांनी चिमणी कंदिलात दिवस काढले. चार आण्याच्या पोस्ट कार्डवर उभ्या जिंदगीची ख्यालीखुशाली पाठवून उत्तरादाखल कित्येक अस्वस्थ रात्री काढल्या. चालून चपला झीझवणारी हि शेवटची पिढी.लग्नातलं लुगडं लेकीच्या पोरीच्या बाळतपणासाठी वापरणारी हि पिढी. लसून कांद्याच्या जुड्या आड्याला लटकावून वर्षभर पुरवून खाणारी हि पिढी. रानात दाना दाना वेचूनहि चार कणसाची बोंडे खुशाल दाराबाहेर चिमणी पाखरासाठी राखून ठेवणारी हि माझ्या आई बापाची पिढी. ठिगळ लावून जगणारीही हि शेवटची पिढी. कपडे फक्त अंग झाकण्यासाठी असतात  हे तत्वज्ञान जगणारी हि शेवटची पिढी.

         कदाचित म्हणूनच माझ्या पिढीला जसा तंत्रज्ञानाचा विटाळ नव्हता तसाच माजहि नव्हता. माझ्या पिढीने बंद पडलेले टीवी कधीच भंगारात विकले नाहीत. बापाचं घड्याळ घालून आम्ही बोर्डाच्या परीक्षा दिल्या.संपलेले सेल फोडून आम्ही खेळगाड्या बनवल्या. ग्याटर आलेले टायर गल्लीबोळातून पळवत तरुण झालो. तुटलेल्या क्यासेट शिवारात गुंडाळून आणि सायकलच्या रिमची कोळपी बनवून  आमच्यातले काही इंजिनियर झाले. आमच्या पिढीत मोठ्या भावाकडून वारसा हक्काने वापरून जुन्या झालेल्या वस्तू लहान भावांकडे आल्या. तंत्रज्ञानाने आम्हाला पांगळे केले नाही. नाती नात्याला आणि मानसं माणसांना या नं त्या कारणाने जोडलेली होती.पैरे होते. इर्जिका होत्या. काही लागेबंध होते. त्यामागे भूमिका होत्या.

          गेल्या काही वर्षात गाव हरवलं. पहिली कुऱ्हाड गावाशेजारी खेटून असलेल्या बलदंड झाडांवर पडली. कारण घाताची सुरुवात अगोदर जे बोलू शकत नाहीत त्यांच्या मुळावर उठण्यापासून होते. आणि गावं भुंडी झाली. हळूहळू ऐसपैस घरांचे सिमेंटचे खुराडे झाले. माणूस मोकळी जागा दिसेल तेथे पाय रोवू लागला. अंगण आटले,मैदानं आकसली. गावाचा गरीब तोंडावळा बदलून माजुर्डेपणा वाढला. शेतीवरचं अवलंबन संपून घरोघरी नोकरदार आले.तुकडीकरण जमिनीचं झालं, तसंच माणसांचं. मानसामानसातल्या नात्याचं. या बक्कळ पैशाचं करायचं काय, हा प्रश्न नव्याने उभा राहिला.  पांढरीतून माती हद्दपार होवून डांबरी रस्ते आले. त्यावरून सुसाट दुचाक्या धावू लागल्या. आटोमोबायील तंत्रज्ञानाचा रानटी अविष्कार असलेल्या या दोनचारशे सीसी च्या रानटी गाड्या आणि त्यावर कानात बाळ्या अडकवलेली झीन्गुरटी पोरं. आणि त्यांच्या कानातले क्वाड. बाहेरच्या जगाशी असलेला संवाद बिल्कूल बंद झाला. नेट आलं. तंत्रज्ञान व्यसन झालं. चार पैसे देवून काही जीबी प्रेम आणि अनलिमिटेड माणुसकी मिळणारी जाहिरात उद्या येयील. तिथेही अशीच गर्दी राहील. कारण या कंपन्या एकदा विकलेला माल परत घेत नाहीत, आणि  वारंटी देवूनही माल खराब लागला म्हणून कुणी बदलायला माघारी येत नाहीत.

        गाव पार पार हरवलं. घरोघरी तंत्रज्ञान घुसलं. रिचार्ज वाढले talktime संपला. पिक्सल वाढले जगण्याचा एक्सल एका एका अटटयाने कमी झाला. बघता बघता पिढी फोरजी झाली. प्रत्येकाचं आयुष्य हि ज्याची त्याची मर्जी झाली. जगणे मल्टीप्लेक्स झाले. चौका चौकात पुढार्यांच्या पराक्रमाचे फ्लेक्स आले. गावाची पार पार रंडकी झाली. गावागावात मिनी महानगरं नांदू लागली. ग्रामपंचायतीच्या मेम्बर्शीपसाठी लोकं काठ्या कुऱ्हाडीनं भांडू लागली. चौदाव्या वित्तानं आणि सातव्या वेतनानं गावं केविलवाणी सुजली.

         कधी काळी हाच गाव हाकेसरशी धावून यायचा. कुणाला दुखलं खुपलं कि गावाचा जीव गोळा व्हायचा. वडिलधार्याच्या शब्दाला किंमत होती.बंधनं होती पण त्या बंधनातच गम्मत होती.
गेल्या काही वर्षात गाव बदलला. बदलता बदलता अनोळखी झाला. आता तर त्याचा थांगपत्ताच नाही. तो हरवला.

       आता तर तो हरवलाय म्हणून पेपरात जाहिरातही देता येत नाही. कारण हल्ली कळून चुकलंय, गेलेली गोष्ट परत येत नाही,मग ते बालपण असो किंवा गावपण. या गावाला चूड लावली म्हणून आपण कुणाच्या नावाने खडे फोडायचे ?  या तंत्रज्ञानाच्या ? कारण तो बदलताना आपल्याला गुदगुल्या झाल्या. तो हरवतानाही आपण होतोच आसपास. दुःख गाव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गाव हरवला हरकत नाही. गावपण हरवायला नको होतं. पण ते तरी गावापासून वेगळे होतंच कुठं ?

       का असे तर नाही कि, या ग्लोबल विलेजच्या कृष्णविवरात गाव नावाची वस्तू गिळंकृत झाली ? गावपण नावाची कन्सेप्टच आऊटडेटेड झाली

काहि जुन्या पासुन नवीन

कळकाने 'यांटीना' हलवून दूरदर्शनच्या मुंग्या घालवण्याचे ब्ल्याकयांडव्हायीट दिवस संपले. मर्फीचा 'रिडीव' कानाला लावून दुश्मनाचा माग काढल्यासारखे केंद्र बदलण्याचे दिवस संपले. मम्बयवरनी 'टील्फून' येताच या टोकावरून त्या टोकाला कुत्र्यागत धापा टाकत पळत जाण्याचे दिवस संपले. स्टीलच्या हातभार लांब 'ब्याटरिकीत' चार चार 'मसाला' शेल टाकून गावाबाहेर शिकार करायला निघाल्यासारखे चिनपाट घेवून परसाकडला जायचे दिवस संपले. क्यासेटांच्या रिळाचे बंडल ज्वारीच्या ताटांना बांधून पाखरं राखायचे दिवस संपले. साठ 'हूलटेजच्या' 'फिलीपच्या' बलात घरभर उजेड पडण्याचे दिवस संपले. एकदा चावी पिळली कि दिवसभर नं थकता गरागरा  फिरणाऱ्या यचेमटी घड्याळाचे दिवस संपले.चुव्वीस नंबरच्या दोन रुपये भाड्याच्या 'याटलस' सायकलवर नळीवर बसून बाप नावाच्या माणसाबरोबर जत्रा खेत्रा करण्याचे दिवस संपले. बाराने तिकिटीत व्हीसीआरवर बच्चनचे सिनेमे पाहण्याचे दिवस संपले.