Monday, 23 August 2010

Mohandas Gandhi was a great person in India, Quotes and great thoughts, photo his.



1> Mohandas Gandhi Quotes

2> The great thought

3> The photo of M. Gandhi

4> The great photo



भारताने विसाव्या शतकात जगाला दिलेली सर्वोत्तम भेट कोणती, असा प्रश्न मी स्वतःलाच विचारला, तेव्हा मला प्रख्यात शास्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचे विधान आठवले. "असा एक महामाणव पृथ्वीवर वावरत होता यावर येणार्ऱ्‍या पिठ्यांचा विश्वास बसणार नाही," असे ते म्हणाले होते. हा महामणव म्हणजे महात्मा गांधी आणि तीच भारताने विसाव्या शतकात जगाला दिलेली सर्वोत्तम भेट! २१ व्या शतकात भारताची जगाला सर्वोत्तम भेट कोणती असेल याचा मी विचार केला. असे जग; जेथे दिवसाला दोन डॉलरपेक्षाही कमी उत्पन्न असणारे चार अब्ज लोक राहतात. असे जग; जेथे ८० कोटी लोकांना दररोज उपाशी राहावे लागते. तापमानवाढ आणि हवामानबदलांसह अनेक आव्हानांमुळे भवितव्य धोक्यात आलेले जग.... मग आपणाला गांधीजींचे दोन सिध्दान्त आठवायला हवे की, सर्वाँचा फायदा होईल अशा प्रत्तेक वैज्ञानिक शोधाला मी पारितोषिक देईन आणि पृथ्वी प्रत्तेक माणसाची गरज भागविण्याएवठी सक्षम आहे; पण प्रत्तेकाची हाव ती भागवू शकणार नाही. पहिला सिध्दान्त परवडण्याविषयी आणि दुसरा सातत्याविषयी आहे.

No comments:

Post a Comment