Saturday, 1 September 2012
जिद्दीची कहाणी
पर्वत , शिखरे पार करण्याची मजा वेगळीच असते नाही. निसर्गावर अशा प्रकारे स्वार होण्याची आवड असेल ना तर वयाचं काय , कोणतीचं बंधनं अडवत नाहीत. यासाठी प्रेमलता अग्रवाल या गिर्यारोहकाचं उदाहरण देता येईल. वय वर्षे ४६. त्यांनी नुकतंच युरोपमधलं ' माउंट एल्ब्रस ' पार केलं. १० जणांच्या टीममध्ये त्या एकट्याच भारतीय होत्या. उर्वरित गिर्यारोहक नॉर्वेचे. मोहिमेला सुरुवात केल्यापासून बेस कॅम्पपर्यंत येईपर्यंत खराब हवामान होतं. परंतु त्याला न जुमानता अग्रवाल यांनी पर्वत सर केला. त्यांनी या आधी अनेक पर्वतावर आपला झेंडा रोवलाय. अजून उरलेल्या महत्त्वाच्या पर्वतांवर चढाई करण्याची त्यांची इच्छा आहे. एकूणच त्यांच्या या उत्साहालाच सलाम!
सुपरमॉम
घरातील कामं किती अंगमेहनतीची. ऑफिसमध्ये जाणाऱ्यांना काय कळणार , किती दमछाक होते ती. पण तेवढा व्यायामच होतो आमचा... गृहिणींकडून नेहमी ऐकायला मिळणारं हे वाक्य. अगदी नोकरदार महिलाही त्याला संमती देतात. पण नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार नोकरदार आई घरी राहणाऱ्या आईपेक्षा हेल्थी असते. या महिलांचं शारीरिक आरोग्य नव्हे तर मानसिकदृष्ट्याही त्या सक्षम असतात. त्यांच्यात उत्साह , शक्ती अधिक असते , असंही या संशोधनात आढळून आलंय. म्हणूनच भरपूर शिका आणि पहिलं मूल होण्याच्या आधी चांगलं करिअर करा , असा सल्ला संशोधकांनी दिलाय.
मिरर फास्टिंग
एका ठिकाणी आरसा आणि बाजूला जगतसुंदरी उभी असेल , तर एखादी मुलगी आधी कुठे बघेल ? आरशात... गमतीनं असं म्हटलं जातं. आरशात बघितल्याशिवाय दिवस कसा जाईल , विचारही करवत नाही ना. पण अमेरिकेत म्हणे काही महिलांनी ' मिरर फास्टिंग ' ही चळवळ सुरू केलीय. आरशात आपलं प्रतिबिंब पाहू नका , असं आवाहन त्या ब्लॉगद्वारे करताहेत. केवळ आरसाच नाही तर कम्प्युटर स्क्रिन , शॉप विण्डो अगदी मोबाइल स्क्रिनमध्येहीचेहरा पाहायचा नाही. अनेक जणींनी महिनोन् महिने हा उपवास केला. माझ्या दिसण्याकडे मी बराचसा वेळ वाया घालवायचे , पण या फास्टिंगमुळे माझ्यातील एनर्जी छंद जोपासायला उपयोगी पडते... यामुळे माझ्याशी अधिक प्रामाणिक होता आलं... आजूबाजूचं सौंदर्य कळू लागलं , असं या उपवासकरांचं म्हणणं आहे. अर्थात या फास्टिंगवरून अनेक मतभेद आहेत.पण आरशापासून स्वतःला लांब ठेवण्याचं कसब मानावंच लागेल.
आयटीत प्राधान्य
ऑफिसमध्ये स्त्री-पुरुष समानता राखण्यासाठी आता अनेक कंपन्या सरसावल्या आहेत. आयटी कंपन्या तर पुरुषांपेक्षा महिलांना प्राधान्य देत आहेत. नुकत्याच बंगळुरू येथे झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये आयटी कंपन्यांनी नोकरी दिलेल्यांमध्ये५२ टक्के महिला आहेत. २०११ आणि २०१०मध्ये ही टक्केवारी अनुक्रमे ३८ आणि ३२ टक्के होती. या इंटरव्ह्यूदरम्यान असं लक्षात आलंय की केवळ कंपन्यांनी धोरण बदलेलं नाही , तर अनेक महिलाही आता या अशा करिअर संधींबाबत जागरूक झाल्या आहेत. तसंच कंपन्यांकडून महिलांना विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे आयटीमध्ये महिलांचं प्रमाण असंच वाढेल , यात शंका नाही.
लढाऊ पदांसाठी तरुणींना तयार करा!
भारतीय सैन्यदलांमध्येसध्या काही ठराविक विभागांमध्येच महिलांना अधिकारीपदावर घेतले जाते. सैन्यात महिलांसाठी असलेल्या संधींमध्ये वाढ करावी , ही अनेक वर्षांपासूनची मागणी असून त्यावरून सातत्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर , महिलांना लढाऊ पदांवर घेण्यासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं , खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अभ्यासक्रमात (एनडीए) महिलांना प्रवेश द्यावा आणि त्यासाठी पूर्वतयारी म्हणून सैनिक स्कूलमध्ये मुलींना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करावी , अशा सूचना संसदेच्या संरक्षणविषयक समितीने संरक्षण मंत्रालयाला केल्या आहेत. त्यामुळे सैन्यातील अधिकाऱ्यांची कमतरता भरून काढण्याबरोबरच सक्षम आणि इच्छुक महिलांसाठी करिअर संधी निर्माण होतील , अशी भूमिका या समितीने मांडली आहे. समितीच्या या अहवालावर काय कारवाई होते , ही आता औत्सुक्याची बाब ठरेल! -RNK
_________oooooooooooooooo
___________ooooooooooooo
_____________ooooooooo
______________oooooo
_______________oooo
_______________ooo
______________oo
_____________o
___________o
________oo
______ooo
_____oooo
___oooooo
___ooooooo
____oooooooo
______oooooooo
________oooooooo
_________ooooooo
_________ooooooo
________oooooo........
_______ooooo.......
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment