Sunday, 14 May 2017

Belong to Mothers Day

मातृदिन निमित्त रामदासस्वामी व त्यांचे  आईचे भेटीची गोष्ट वयाच्या ३६व्या वर्षी रामदासस्वामी महाराष्ट्रात परत आले.
  समर्थांनी आईला चर्मचक्षूंबरोबर ज्ञानचक्षूही दिले
भारत प्रवास करतांना शेवटी समर्थ पैठणला आले. पैठणला ते नाथांच्या वाड्यातच उतरले. नाथ आणि त्यांची पत्‍नी या दोघांनी देह ठेवलेला होता. नाथांची पत्‍नी समर्थांची मावशी होती. पण समर्थांनी कुणालाच ओळख दिली नाही. एक फिरता साधू म्हणून ते त्या घरात राहिले.
  मात्र तिथे त्यांना जांब गावातील सगळ्या बातम्या समजल्या. लग्नमंडपातून पलायन केल्यावर २४ वर्षे जांबशी त्यांचा कोणताच संपर्क नव्हता. त्यांच्या वहिनीला दोन मुले झाल्याचे व आई राणूबाई अंध झाल्याचेही त्यांना तेथे कळले. समर्थ वैराग्यशाली असले तरी तुसडे नव्हते.
  त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावे, असे येऊन गेले. समर्थ जांबला पोहोचले, पण तेथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही. अगदी नाट्यमय पद्धतीने आपल्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली. त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली. तिची राम आणि शाम ही दोन्ही मुले भिक्षा मागणार्‍या गोसाव्याकडे पाहत होती. त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत. २४ वर्षात दाढी, जटा वाढविल्याने आणि व्यायामाद्वारे शरीर बलदंड झाल्याने पार्वतीबाईदेखील दीराला ओळखू शकल्या नाहीत. अखेर समर्थांनी आपले खरे रूप प्रकट केले. नारायण आल्याने राणूबाईंना खूप आनंद झाला. २४ वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या. त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच राणूबाईंना दिसू लागले, असे म्हणतात.
  तिने विचारले - ' नारायणा, अरे तप करून कोणते भूत वश केलेस बाबा?' त्या वेळी समर्थांनी एक अभंग रचून संपूर्ण रामचरित्र आईला ऐकविले. समर्थ चार महिने जांबला राहिले. त्यांनी आपल्या आईला 'कपिल गीता' हा आध्यात्मिक ग्रंथ समजावून सांगितला. आईला चर्मचक्षूंबरोबर ज्ञानचक्षूही दिले.(विकिपीडिया)
मातृदेवो भव

No comments:

Post a Comment