आपणास झालेला कोरोना या आजारापासून आपण पूर्णपणे बरे होऊ शकतो ते ठिकाण म्हणजे पनवेल उपजिल्हा रुग्णालय.
माझ्यासाठी सुपर हिरो आहेत ते म्हणजे पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथिल संपूर्ण रूग्णालय स्टाफ , नर्स, डॉक्टर्स , पॅरामेडिल स्टाफ, वॉर्डबोय,सफाई कर्मचारी. आहेत.
आज ते स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता पुर्ण वेळ कोरोना रुग्णाच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतेले आहे.
मी स्वतः हा कोरोना रुग्ण होतो .१९ तारखेला माझी कोरोना टेस्ट पझिटिव्ह आली होती .हे समजतात मला मानसिक धक्का बसला . आणि मला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे ऍडमीट करण्यात आले . वॉर्ड न.२९.
ऍडमीट झाल्यावर पहिले १५ मिनिटे अस वाटल की माझ्या आयुषयातील शेवटच्या दिवसांचा प्रवास चालू झाला आहे.
पण थोड्याच वेळात माझ्या समोर उभे होते डॉक्टर्स वेषेतील असलेले देवदूत म्हणजे पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथिल संपूर्ण स्टाफ .
माझी संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली .माझा एक्स रे, ECG., रकत्तपासणी करण्यात आली . आणि माझा कारोनामुक्तीचा प्रवास सुरू झाला.
पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथिल सर्व स्टाफ ने वेळोवेळी माझ्या आरोग्याविषीची विचारणा केली . वेळोवेळी ऑक्सीमीटर ने मोनिटरेट करण्यात आले. वेळोवेळी लागणारे औषधे , गरम पणी देण्यात आले.
पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथिल येणारं सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण उतम प्रतिचे होते .तसेच तेथील सफाई कर्मचारी चांगल्या प्रकारे स्वछता ठेवतात.
एवढं सगळं या सर्व पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथील स्टाफ ने स्वतःच्या आरोग्य जपून न घाबरता सर्व रुग्णांची रात्रंदिवस सेवा केली आहे आणि अहोरात्र सेवा करत आहेत.
अशा या पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ ला माझा संस्नेह नमस्कार.
आणि मला २४ जुन रोजी मला कारोनामुक्त करून सोडण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालय,वॉर्ड न.२९
बरे झालेल्या रुग्णाचे नाव.
अजित पाटील
No comments:
Post a Comment