Saturday, 29 October 2011

मराठी भाषेची ओळख



मराठी भाषा
इतिहास:
“महाराष्ट्री प्राकृत” या “संस्कृत” पासून उगम पावलेल्या भाषेचा कालांतराने इतर भाषांसोबत मिलाप होऊन “मराठी” या भाषेचा विकास झाला. इसवी सन ८७५ च्या आधी पर्यंत आताच्या भारतीय खंडानुसार संपूर्ण दाक्षिणात्य प्रदेशावर सतवहन या योध्याचे शासन होते. गोदावरी नदीजवळील त्यावेळच्या “कोटिलंगला” या करीमनगर जवळील ठिकाणी त्याची राजधानी होती. या राजाच्या शासनकाळात “महाराष्ट्री प्राकृत” हीचत्याच्या राज्याची अधिकृत बोली-भाषा होती. उत्तरेकडील माळवे आणि राजपूत ते दक्षिणेकडील कृष्णा आणि तुंगभद्रा या नद्यांच्या खोर्‍यांमध्ये वास्तव्य करणार्‍या लोकांकडून त्यावेळी “महाराष्ट्री प्राकृत” या भाषेचा वापर केला जात असे. आजच्या मराठी आणि कानडी भाषा या कित्येक काळापर्यंत “महाराष्ट्री प्राकृत” भाषेचा भाग म्हणून ज्ञात होत्या. त्यानंतर जैन धर्मियांकडूनबोलल्या जाणार्‍या “महाराष्ट्री अपभ्रंश” या भाषेचा काही शतके वापर होत राहिला. येथेच मराठीच्या व्युत्पत्तीला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. बहुतेक ऐतिहासिक संशोधनांतून हे स्पष्ट झाले आहे की, मराठी ही ८व्या शतकापासून बहुतेक लोकांकडून बोलली जात असावी.
थोडक्यात:
उच्चार: मराठी [məˈɾaʈʰi]
मराठी ही संयुक्त महाराष्ट्र राज्याची अधिकृत राज्यभाषा आहे.
जगभरातील सुमारे ९०० कोटी लोक मराठी बोलतात.
मराठी भारतवर्षाच्या साता-समुद्रापार आजही एक महान भाषा म्हणून संबोधली जाते.
भारत देशातील सर्वात जास्त बोलल्या जाणार्‍या भाषांपैकी मराठी चौथ्या स्थानावर आहे, आणि जगात तीचे स्थान १५व्या क्रमांकावर आहे.
सुमारे १३०० वर्षांपूर्वी किंवा त्याआधी “संस्कृत” आणि “पाली” या आर्य आणि बौद्ध बोली भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला. त्यावेळी “मराठी” मधील बहुतेक शब्द हे संस्कृत आणिपाली या मुख्य भाषांमधून अपभ्रंश होऊन आले असावेत.
मराठी भाषा लिहिण्यासाठी मुख्यत्वे “देवनागरी” लिपीआणि “मोडी” लिपी वापरली जाते.
दक्षिण कर्नाटकमधील श्रवणबेलगोळा गोमटेश्वर (बांधणी: सन ९८३) येथील एका दगडाच्या पायथ्याशी “श्रीचावुण्डराजे करवियले,श्रीगंगराजे सुत्ताले करवियले” अशी वाक्यरचना आहे, ज्याचा मराठीत असा अर्थ होतो की, “गंगाराजे यांचे पुत्र चावुंडराजे यांनी बांधले.” यावरून असे सिद्ध होते की, मराठी ही ८ व्या शतकापासून प्रचलित होती. तसेच ८ व्या शतकातील प्रचलित जैन धर्मियांच्या “कुवालयमाला”मध्ये एका ठिकाणी बाजाराचे वर्णन करीत असतांना मराठ्यांमधीलसंभाषणांमध्ये “दिहले (दिले)”, “गहिले (घेतले)” हे शब्द आढळतात. पंचतंत्राचा मराठीमधील मुळ अनुवाद हा देखील याच काळातील असावा, असा कयास व्यक्त केला जातो.
१० व्या शतकाच्या नंतर देवगिरी राजधानी असलेल्या यादव शासकांनी मराठीचा उद्धार करण्यात खुप मोठे योगदान दिले. यादवांच्या शासनकालातील नलोपाख्यान, रूख्मिनी-स्वयंवर, श्रीपतीची “ज्योतिष रत्नमाला” यामध्ये मराठीचामुख्यत्वे उपयोग केला गेला.
मराठी साहित्यातील सर्वांतजुने काव्य “विवेकसिंधू” हे नाथ पंथातील योगी असलेल्या मुकुंदराज यांनी लिहिले आहे.
यादवांच्या काळात तयार झालेल्या महानुभव आणि वारकरी या दोन्ही पंथांनी मराठीचा विस्तार करण्यास मोलाची कामगिरी पार पाडली, आजही त्यांचे ते कार्य अविरत चालू आहे.
महानुभव पंथातील चक्रधर स्वामींशी संबंधित “लीळाचरित्र (सन १२३८)” हे मराठीतील आद्य-साहित्याचे एक महत्वाचे उदाहरण आहे.
त्यानंतर संत ज्ञानेश्वर (सन १२७५ ते सन १२९६) यांनी सन १२९० मध्ये लिहिलेले भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) आणि अमृतानुभव ही काव्ये जगतविख्यात आहेत. यांद्वारे मराठीला सुगीचे दिवस प्राप्त झाले. संत ज्ञानेश्वरांनी त्यावेळी फक्त संस्कृत मध्ये उपलब्ध असलेल्या “भगवत गीता” ला मराठीमध्ये अनुवादित केले, तसेच भावपूर्ण अभंग लिहिले.
महानुभव पंथाचा विस्तार करीत वारकरी पंथातील संतकवी एकनाथ (सन १५२८ ते सन १५९९) यांनी “भावार्थ रामायण” (मुख्यत्वे मराठीमधून) याद्वारे समाजपयोगी संदेश दिले. संत तुकाराम (सन १६०८ ते सन १६४९) यांनी वारकरी पंथाची धुरा सांभाळून मराठीमध्ये सुमारे ३००० अभंग लिहिले.
छत्रपती शिवाजी महाराज (सन १६२७ ते सन १६८०) यांनी मराठीला देशाच्या काना-कोपर्‍यात विस्तार करण्यास तसे़च मराठीमध्ये साहित्य-विकास होण्यास वावदिला.
१८ व्या शतकातील वामन पंडित(यथार्थदीपिका), रघुनाथ पंडित (नल-दमयंति स्वयंवर),श्रीधर पंडित (पांडव प्रताप, हरीविजय, रामविजय) आणि मोरोपंत (महाभारत) या मंडळींनी मराठी साहित्यात अनमोल भर घातली. पेशव्यांनीही त्यांच्या शासनकाळात मराठीच्या विकासाकडे अधिक लक्ष पुरविले.
इंग्रज शासनकाळात मराठीच्या विकासाची घोड-दौड सुरूच राहिली. सन १ मे, १९६० या दिवशी विदर्भ आणि मराठवाडा हे प्रांत मिळून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, आणि त्यानंतर मराठीलासंयुक्त महाराष्ट्राची अधिकृत मातृभाषा म्हणून दर्जा मिळाला. त्यानंतर, मराठी भाषेतील साहित्यावर चर्चा करण्यासाठी आणि विकास होण्यासाठी, दरवर्षी,नित्यनियमाने “अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलन” भरवले जाऊ लागले. यासोबतच, “अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन”ही भरवले जाऊ लागले.दोन्ही संमेलने आजही अविरतपणे दरवर्षी भरवली जातात.
मराठीच्या प्रांतिय-बोली भाषा:
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, द्वारे वेळोवेळी मानकमराठी विकसित करण्यासाठी मदत केली जाते. महाराष्ट्रामध्ये शुद्ध मराठी बोलणारा प्रांत म्हणून “पुणे” प्रांताची ओळख आहे. याव्यतिरिक्त इतर प्रांतांमध्ये मराठीच पण काही ऐतिहासिक प्रसंगांमुळे जरा वेगळेपण निर्माण झालेल्या मराठीच्या बोली भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात. त्यांपैकी अहिरानी (जळगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, परोळा, अमळनेर तालुके या भागांमध्ये मुख्यत्वे, मोडी लिपीचा लिहिण्यासाठी वापर केला जातो.)

No comments:

Post a Comment