खान्देशी (जळगाव जिल्हा, तसेच धुळे जिल्हा. अहिरानीशी साम्य.), वर्हाडी (विदर्भ), सामवेदी (मुंबईतील नाला सोपारा, विरार ते वसई तालुका, ठाणे. पोर्तुगिजी भाषेचा प्रभाव.), कोंकणी (कोकणातील काही भाग. हिच्याही काही बोली भाषा आहेत, त्यापैकी कोळी, कुणबी, आगरी, धनगरी, ठाकरी,संगमेश्वरी, माओली या मुख्य आहेत. गौण कोंकणी हीएक विशिष्ट भाषा आहे. ती मराठीची बोली भाषा नाही.), वडवाळी (नायगाव, वसई ते डहाणू पर्यंतच्या भागातीलसोमवंशी क्षत्रियांची भाषा म्हणून ओळख.), अरे मराठी (आंध्रप्रदेशातील काही प्रदेश), ठाकरी (रायगड जिल्ह्यातील आदिवासी लोकांकडून बोलली जाणारी एक मुख्य बोली भाषा), डांगी (महाराष्ट्र-गुजराथ सीमेवरील लोकांची बोली भाषा), दख्खिनी (हैदराबादी उर्दूचा आणि तेलुगु भाषेचा प्रभाव असलेली भाषा) या काही मुख्य बोली भाषा आहेत.
काही मराठी संघटना:
राज्य मराठी विकास संस्था
अखिल भारतिय मराठी साहित्य महामंडळ
मुंबई मराठी साहित्य संघ
मराठी विश्वकोश (encyclopedia) उपक्रम
विदर्भ साहित्य संघ, नागपूर
मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद
गोमंतक मराठी ऍकॅडमी
मध्यप्रदेश साहित्य परिषद, जबलपूर
आंध्रप्रदेश साहित्य परिषद, हैदराबाद
मराठी साहित्य परिषद, कर्नाटक
लिप्या (scripts):
मराठी देवनागरी (बाळबोध) लिपी:
१६ स्वर आणि ३६ व्यंजने असे एकूण ५२ अक्षरे असलेली ही लिपी आहे. डावीकडून उजवीकडे लिहीली जाते. इतर देवनागरी भाषांव्यतिरिक्त (उदा. हिंदी आणि इतर) मराठी लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा जरा वेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. आज बहुतांशी प्रत्येक ठिकाणी या लिपीचा वापर होतो. (देवनागरी लिपीसंदर्भात एक विशेष लेख “मराठी मंडळी” वर उपलब्ध आहे: देवनागरी लिपी– ओळख आणि इतिहास )
मोडी लिपी: घसरती लिपी म्हणून ओळख. मराठा शासकांच्या शासनकालातील बहुतेक दस्तऐवज हे मोडी लिपी मध्ये आढळले आहेत. लिहिण्यास अवघड असल्याने ही लिपी दुर्मिळ होत चालली आहे. (मोडी लिपीसंबंधित अतिशय महत्वपूर्ण माहिती भानस ताईंनी येथे लिहीली आहे, त्यावर एकवेळ अवश्य नजर फिरवावी.)
आढावा
मराठी ही स्वतंत्र भारत देशातील, संयुक्त महाराष्ट्रातील बहुतेक लोकांकडून बोलली जाणारी (प्रथम दर्जाची) भाषा आहे. महाराष्ट्राशिवाय, भारतातील अनेक राज्यांमध्ये मराठी बोलणार्यांची संख्या विस्तिर्ण आहे. मुख्यत्वे गुजराथ, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गोवा, कर्नाटक, दमण-दीव, दादरा नगर हवेली या राज्यांमध्ये मराठी भाषिकवास्तव्य करून आहेत. हैदराबाद, बेळगांव, बडोदा,सुरत, इंदूर, ग्वालियर (मध्यप्रदेश) या मुख्य शहरांमध्ये मराठी भाषिकांचा खुप मोठा आणि स्वतंत्र असा एक वेगळा समुदाय आहे, हे भाषिक तेथील अधिकृत भाषांसह मराठीचाही प्रसार करीत आहेत.
याशिवाय मराठी भाषिक संपूर्ण जगभरात आहेत. मुळचे मराठी, परंतु कित्येक कालांतरापासून परकिय देशांमध्ये वास्तव्य करून असणारे अनेक लोक आहेत. त्यांचे वास्तव्य अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये अधिक आहे. तसेच, युरोपिय राष्ट्रे (इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, ऑस्टिया,ग्रीस), अरब राष्ट्रे (सिंगापूर), मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलॅंडया राष्ट्रांमध्येही मराठी भाषिकांची व्याप्तीअधिक आहे.
भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक आहे. भारतीय संविधानात तशीतरतूद आहे. संयुक्त महाराष्ट्र राज्य, गोवा, आणि दमण व दीव तसेच दादरा नगर हवेली या संघ राज्यांनी मराठीचा सर्व शासकिय कामांसाठी तसेच सांस्कृतिक भाषा म्हणून स्विकार केला आहे. महाराष्ट्रातील अधिकृत विद्यापीठांव्यतिरिक्त गोवा विद्यापीठ (पणजी), उस्मानिया विद्यापीठ (आंध्रप्रदेश), महाराज सयाजीराव विद्यापीठ (बडोदा), गुलबर्गा विद्यापीठ (कर्नाटक), देवीअहिल्या विद्यापीठ (इंदूर) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (नवी दिल्ली) या महाराष्ट्राबाहेरील अधिकृत विद्यापीठांमध्ये मराठी भाषेमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी विशिष्ट अभ्यासक्रम आणि विभाग बनवले गेले आहेत.
No comments:
Post a Comment