(नक्की वाचा.. आवडलं तर पुढे पाठवा..)
१५ लाखाचे स्वप्न:
काही दिवसांपूर्वी कुठून तरी अफवा ऐकली की पंतप्रधानांनी आश्वासन दिले होते की प्रत्येकाच्या खात्यात १५-१५ लाख
रुपये जमा होणार..
(मात्र असे आश्वासन कोणीही दिलेले नव्हते)
१५ लाख रुपये माझ्या खात्यात जमा होणार आणि मी श्रीमंत होणार; काल रात्री विचार करत करत निद्रावस्थ झालो की
हे सत्य असायला हवे होते..
रात्री झोपेत असताना स्वप्न पडले की माझ्या फोनवर एस.एम.एस. आला की 'बँक ऑफ महाराष्ट्रच्या आपल्या बचत
खात्यामध्ये भारत सरकारकडून १५ लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत, धन्यवाद !'
मी आनंदाने वेडापिसा झालो, खोलीतून बाहेर पडलो उड्या मारत मारत सगळ्यांना सांगू लागलो, "बघा बघा
सुखाचे दिवस आले; माझ्या खात्यामध्ये भारत सरकारकडून १५ लाख रुपये जमा करण्यात आलेत..!!"
घरचे म्हणाले जास्त आनंदी होऊ नकोस सगळ्यांच्याच खात्यात पैसे जमा झालेले आहेत तुझ्या एकट्याच्याच नाही..
(खरं सांगतो प्रचंड दु:ख झाल.. :-( )
मग विचार केला चला जाऊ मित्रांना दाखवू.. मित्रांकडे गेलो मित्र म्हणाले जास्त उड्या नकोस मारू आमच्या
खात्यामध्येसुद्धा भारत सरकारकडून १५ लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत.. सगळ्या आनंदावर पुन्हा एकदा
विरजण.. :-(
मग म्हटल चला बाजारातून भरपूर खरेदी करू.. तिथ गेलो तर दुकान बंद! बाजूच्याला विचारले,"भाऊ, हे गोंजारीभाऊंचे
दुकान आज का बंद..??"
समोरचा व्यक्ती उत्तरला,"गोंजारीभाऊंनी दुकान आता कायमचे बंद केले आहे, त्यांच्या खात्यामध्ये
भारत सरकारकडून १५ लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत; आता त्यांना दुकान चालवायची काय गरज..??"
मग म्हटलं चला एखाद्या मॉलमध्ये जाऊन खरेदी करू.. तिथ देखील सगळी दुकान बंद होती; लोकांच्या खात्यात
१५-१५ लाख रुपये जे जमा झालते..
म्हटल जाऊद्या चला एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन भरपेट जेवण करू.. जाऊन बघतो तर काय कोणीच
नव्हते; इतकेच काय तर सुरक्षारक्षकदेखील तिथे नव्हते, कारण काय तर ते देखील आता श्रीमंत झाले होते,
सगळ्यांकडे १५-१५ लाख जे आले होते..!! पुढे गेलो तर वडापाववाले, चहावाले, सरबतवाले, पावभाजीवाले,
मंडईतील भाजीविक्रेते सगळे पैसे काढण्यासाठी बँकेत गेले होते.. कुणाला काही काम करण्याची आवश्यकताच
उरली नव्हती; सगळ्यांजवळ १५-१५ लाख रुपये जे होते..!!
शहरातून बाहेर गेलो, बघतो तर काय कंपन्या बंद...!!!!! सगळ्या कर्मचाऱ्यांना १५-१५ लाख रुपये मिळाले होते..
सगळे मिळून नाचत होते,'सुखाचे दिवस आले आहेत.....'
सायंकाळी शेताकडे गेलो तर शेतातदेखील कोणी नव्हते.. शेतकरी शेती सोडून गेले होते.. आता त्यांना उन्हात,
पावसात काम करण्याची गरजच उरली नव्हती.. दवाखान्यात गेलो तर डॉक्टर पत्ते खेळत होते म्हणाले,"आम्हाला
काही उपचार वगैरे नाही करायचे; आमच्या आयुष्यासाठी १५ लाख रुपये पुरेसे आहेत.."
६ दिवसानंतर ऐकावयास मिळाले, लोक उपासमारीने मृत्यू पावत आहेत कारण शेतात धान्य-भाजीपालाच नाहीय्य..
रेशनची दुकान बंद आहेत.. रोगराई पसरायला लागलीय.. पशू-जानवरे देखील मरत आहेत कारण शेतातून चारा
मिळत नाहीय्य.. लहान मुले देखील भूकेने कासावीस झालेली आहेत.. कारण गोमाता दूध देण्यास असमर्थ ठरत
आहे.. लोक लाख-लाख रुपये घेऊन रस्त्यावरून सैरावैरा धावत सुटत आहेत या आशेने की कोठेतरी
काहीतरी खावयावयास मिळेल.. "हे घ्या ५० हजार रुपये; १०० ग्रॅम दूध द्या.. दोन दिवसांपासून माझी मुलगी
उपाशी आहे हो.."
१२ दिवसांनंतर लोकांचे मरण्याचे प्रमाण विलक्षण वाढले.. जे जीवंत आहेत ते पैश्यांच्या थैली घेऊन रस्त्यावर
बसले, हे घ्या ५ लाख आणि मला ५ किलो गहू द्या.. आठवड्यापासून भूकेलेले आहोत; कुठेच काही मिळेना..
सगळीकडे प्रेतांच्याच लाटा दिसतायत..
मी देखील १५ लाखांची थैली घेऊन पळतोय, हे घ्या, हे घ्या साहेब १५ लाख रुपये पण चतकोर तरी चपाती द्या..
(तेवढ्यात आईचा आवाज आला..)
"उठ घोड्या उठ..
केव्हापासून तक्क्याला लाथ मारून म्हणतोयस मेलो मेलो मेलो.. एखादे वाईट स्वप्न बघितलेस काय लेकरा..??"
उत्तरलो,
"नाही, आई, सुखाच्या दिवसांचे (अच्छे दिन) स्वप्न बघितले..!!
त्यापेक्षा चांगले तर सध्याचे गरीबीचे दिवस आहेत.. गरीब असलो तरी घरात अन्न आहे, पाणी आहे, लहान लेकरं
खेळतायत, पशू शेतात चरतायत, दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दीय, लोकांचे येणे-जाणे चालूय.. व्यवहार सुरळीत
आहेत..
हे भगवंता, १५ लाख कधीच कोणाच्या खात्यात न जमा झाल्यास किती चांगलेय.. तेच काळे पैसे सरकारी
योजनांमध्ये जनकल्याणासाठी वापरावेत..
आणि आणखी एक-
ज्यांना ज्यांना वाटते की १५-१५ लाख कुठायत..?? माझ्या खात्यात अजून जमा झाले नाहीत.. त्यांनी शांत चित्ताने
तटस्थ होऊन विचार करावा की १५-१५ लाख जमा झाले तरच सुखाचे दिवस आले ही भूमिका योग्य आहे का.. शेवटी सगळ्यांजवळ विचार करण्याची क्षमता आहेच..
🙏🏻 धन्यवाद 🙏🏻
🇮🇳 वंदे मातरम् 🇮🇳
No comments:
Post a Comment