तिथी आणि तारखेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे माहितीये? 🤔
तुम्हाला जर आज उचलून कुणी एखाद्या निर्जन बेटावर नेऊन सोडले तर तारीख फार फार तर महिनाभर लक्षात राहील तुमच्या. त्यातही एखादाच जरी दिवस चुकला तरीही पुढचं सगळंच चुकणार, हे निश्चित. पण तिथीचं तसं नाही. तुम्ही एखाद्या निर्जन बेटावर असलात तर महिनाभराने कदाचित तिथीही विसरुन जाल. पण जर तुमचा खगोलशास्त्राचा जुजबी अभ्यास असेल तर चंद्राची कला आणि पौर्णिमेला चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे, केवळ एवढ्याच निरीक्षणावरुन तुम्ही तिथी, महिना आणि पक्ष, तिन्ही ठरवू शकता. अगदी बिनचूक. आज मोठमोठ्या शहरांमध्ये दुर्बिणीद्वारे आकाशदर्शनाचं फॅड आलंय. मी ह्या खगोलशास्त्र प्रसाराच्या क्षेत्रात तब्बल ६ वर्षे काम केलंय मित्रांनो. जे ज्ञान मिळवण्यासाठी तुमच्यापैकी अनेकांनी रांगा लावल्या असतील, ते ज्ञान प्राचीन काळापासून प्रत्येक हिंदूला अगदी नकळत्या वयातच शिकवले जायचे. केवळ आणि केवळ कालगणनेसाठी!! आजसुद्धा खेड्यापाड्यांमध्ये अशी कित्येक वृद्ध मंडळी तुम्ही पाहिली असतील, जी कोणतेही घड्याळ वापरत नाहीत आणि तरीही केवळ सूर्याच्या अथवा चंद्राच्या स्थितीवरुन अचूक वेळ सांगतात. ही आहे हिंदूंची कालमापनपद्धती. जे तिथीला मानत नाहीत आणि ज्ञान केवळ ब्राह्मणांपुरतेच मर्यादित होते अशी फेकाफेक करतात, त्यांनी एकवार आपल्या आजोबांना अथवा आजीला याबद्दल चौकशी करावी. ते सांगतील ही कालमापनपद्धती प्रत्येक सामान्य माणूस आपल्या आयुष्यात कशी वापरायचा ते. आणि ती सगळ्या जातीवर्णांच्या अगदी सामान्य माणसापर्यंत पोहोचवली गेली होती, यावरुनच हिंदूंना संशोधनाच्या दृष्टीने कालगणना किती अत्यावश्यक वाटत असे हे समजते.
इंग्रज येण्याच्या आधीपासून भारतात चारही वर्णच नव्हेत तर अगदी स्त्रियासुद्धा सर्रास शिक्षण घेत असत, हे श्री. धर्मपाल यांच्या "अ ब्युटिफुल ट्री" ग्रंथात सिद्ध केलंय. इंग्रज आल्यानंतर भारतीय, विशेषतः स्त्रिया शिकू लागल्या ही इंग्रजांनी मारलेली शुद्ध थाप आहे, जिला आजही स्वतःला पुरोगामी म्हणवणारी अक्कलशून्य जमात उचलून धरते. प्रत्यक्षात इंग्रजांनी आमचं उपरोल्लिखित रोजच्या आयुष्याला पूरक असं सकस शिक्षण बंद केलं आणि त्याऐवजी त्यांच्या कारभाराला सोयीचं असं कारकूनी शिक्षण द्यायला सुरुवात केली. याचाच परिणाम आजही दिसतो की, एखादी व्यक्ती शिकलेली असली म्हणजे तिला अक्कल असेलच याची आजही खात्री देता येत नाही. यांच्यापेक्षा आमच्या रुढार्थाने कमी शिकलेल्या सिंधूताई सपकाळ जास्त सुशिक्षित वाटतात की मग!! असो. तर त्याचसोबत इंग्रजांनी आमची विज्ञाननिष्ठ कालमापनपद्धती नष्ट करुन सगळीकडेच त्यांची अवैज्ञानिक आणि अपूर्ण कालमापनपद्धती लागू केली. मी मुद्दामच विज्ञाननिष्ठ आणि अवैज्ञानिक असे दोन शब्द वापरतोय. यामागे एक महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो. विज्ञानानुसार काळ ही एक मिती आहे. आणि म्हणूनच ती नेहमीच सापेक्ष असते. त्यामुळेच आपण काळ मोजण्यासाठी जितकी अधिक परिमाणं आणि संदर्भ लावू तितका तो अचूक येतो. इंग्रजांच्या मुळात कॅलेंडरमध्येच ग्रेगोरियन आणि ज्युलियन असे घोळ. त्यातून दिवसांचा होणारा बेहिशोब कसाबसा सावरण्यासाठी दर महिन्याआड १ दिवस वाढवणं आणि फेब्रुवारीत कधी १ तर कधी २ दिवस कमी करणं अशी बनवाबनवी आहेच. इतके करुनही ह्या कॅलेंडरमध्ये महिना, तारीख आणि वर्षच तेवढे समजते आणि घड्याळात केवळ तास, मिनिटे व सेकंद. याउलट हिंदू पंचांगाच्या नावातच त्याचा अर्थ दडलाय. पंच अंग म्हणजे पाच अंगे. कोणकोणती पाच अंगे? तर तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग. प्रत्येक दिवसाला ही पाच परिमाणे लावली जातात, तेव्हा कळणारा काळ हा इंग्रजी कॅलेंडरपेक्षा केव्हाही जास्तच अचूक असतो. शिवाय प्रहर, घटीका, पळे इ. तर वेगळेच!!
लक्षात घ्या, इथे फक्त रोजच्या जीवनातलं कालमापन तेवढं घेतलंय. याहून खोलात गेलो तर फारच धक्कादायक निष्कर्ष निघतात. भागवतपुराण हे अतिशय प्राचीन आहे. आपल्या सवयीप्रमाणे सारे काही शक्यतो बायबलच्या नंतरचे ठरवायचे ह्या अट्टाहासापायीदेखील पाश्चिमात्त्यांना त्याचा काळ सहाव्या शतकाच्या पुढे ओढता आलेला नाही. ह्या भागवतपुराणाच्या ३ऱ्या स्कंधाचा ११वा अध्याय वाचा. कालमापनाची परिमाणे दिली आहेत त्यात. सगळ्यात सूक्ष्म परिमाण सांगितलेय परमाणू. सगळ्यात मोठे सांगितलेय ते श्रीहरिचा एक निमेष अर्थात हरिनिमेष. संपूर्ण अध्यायच सूक्ष्मापासून जडापर्यंत काळ कसा मोजायचा हे स्पष्ट करण्यासाठी वाहिला आहे. मी यावर पूर्वी गणित केले होते. जोडीला एक संगणकतज्ञ मित्र त्याच्या अत्याधुनिक संगणकासह मदतीला होता. गंमत काय झाली? सगळ्यात सूक्ष्म काळ मोजताना आणि सगळ्यात मोठा काळ मोजताना, दोन्ही वेळेस त्याचा अत्याधुनिक संगणक ताण सहन न होऊन अक्षरश: बंद पडला!! याचाच दुसरा अर्थ असा की, गोऱ्या चमडीला ज्याकाळी चमडी झाकण्यासाठी झाडाच्या साली गुंडाळण्याइतकीसुद्धा अक्कल आली नव्हती, त्याकाळापासून आपण अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्मापासून मोठ्यातमोठ्या काळापर्यंत अचूक कालमापन करतो आहोत. अहो, येत्या गुढीपाडव्याला युगाब्द किती सुरु होतोय माहितीये? ५११९! यावरुन दिसते की, आज जे कॅलेंडर वापरतो ना आपण, त्याच्या किमान ३००० वर्षे आधीपासून आपण रोजच्या आयुष्यात कालगणना करतोय.
साभार जसे मिळाले तसे
No comments:
Post a Comment