======================
काय सुभाण्या आज उशीर का झालं र ? आम्ही कवा धरणा इथ पारावर तूझी वाट बगतोय.
काय नाय सोम्या, लेक गेलाय शहारा कड, नातू कॉलेजात आणि नात शाळला. आज लेक बाहेर हाय म्हणूनच्यान सून गेली गुराकड, गुर तटात लावलान आणि आली घाई-घाईन घरी,
मला आपली भाकरी भाजून दिलान, मी खाल्ली आणि वाटला लागलो.
सुभान बाबांनच उत्तर ऐकून, सोमनाथ बाबा बोलले,
"बरं म्हणज भाकरीला उशीर झाला म्हणायचा, असना आलास हा बरा केलास"
मी आज सकाळीच गावी पोचलो होतो, थोडासा आराम करून, गावच्या पारावर पोचलो. थंडीचे दिवस नुकतच सुरू झाले होते, बोललो थोडा कोवळ उन घेऊ आणि त्या बरोबर पारावर बसून गावच्या जुन्या जाणत्या लोकांच्या गप्पा ऐकू.
सर्व जण उन घेण्यात मग्न होते, मी विचारपुस करावी म्हणून, काय बाबा काय म्हणताय, तबीयत काय बोलतेय सर्वांची ?
सुभान बाबा बोलले, एकदम ठण-ठणीत, ७७ वर्षाचा झालो, खाल्लेलं पचतय, झोप चांगली लागतेतय, स्वतःच सर्व स्वतः करतोय, अजून काय हवं ?
देवानं आता पर्यंत आम्हाला सर्व भर-भरून दिलं फक्त असाच न्याव , उगाच अथरूनावर पडून राहण्याची वेळ येऊ न द्यावी हीच एक शेवटची इच्छा.
नाय, तसा पोरा-बाळा करतील हो शेवटी पर्यंत, त्यात काय वाद नाय, पण हयात मेहनतीनं सर्व उभा करण्यात गेली , कुणाला कसला ताप दिला नाही, उगाच जाता जाता कुणाला त्रास नको.
मालकीण गेली २ वर्षा पूर्वी , आता कधिबी बुलावा येऊदे , मी तयार आहे.
काय र सोम्या ?
हो - हो मी पण, जाऊ झो सोबत, बघू झो वर्ती काय वाडलेला आहे तो.
आणि सुभाण्या झो गेल्या गेल्या बघू अबू आणि खाश्या काय करत असतील ते ? 😃 सोमनाथ बाबा बोलले.
आमच्या बाजूला अजून थोडी वयस्कर मंडळी होती, वयानी ह्या दोन्ही पेक्ष्या थोडी लहान होतो, सोमनाथ बाबा बोलतच सर्व हसायला लागले.
अबू आणि खाश्या हे या दोघांचे अगदी खास जोडीदार, दोघेही २ वर्षा-पूर्वी देवाघरी गेले होते. त्या वर सुभान बाबा दुसरा विनोद नाय करतील तर कशाला हवा ? बाबा बोलले अबू लोकांची नारली चोरीत असल आणि खाश्या काजू चोरीत असल. मेले आपल्या आधी गेलं आहेत वर , वाईच झाडा-माडा लावतील तर कशाला हवाय ?
सोमनाथ बाबन च ह्या वर उत्तर मेल्यानी इथ जमनिवर काय लागवड केलिन नाय बा त वर ढगात करतायत, मेल ?
पुन्हा एकदा मोठा हास्य 😃
आयुष्यभर संघर्ष केलेली ही मंडळी , मेहनतीने मिलेल त्यात आणि थोडक्यात समाधान मांननारी ही पिढी . मृत्यू सारख्या गंभीर विषयाला पण कधी भाव नाही दिला यांनी, त्याचाही विनोद करून मोकळे.
थोड्या इकडच्या - तिकडच्या गप्पा झाल्या मग मी म्हणालो काय बाबा ग्रामपंचायत काय बोलतेय ? निवडणुका आल्यात ? काय तयारी आहे की नाही.
सुभान बाबा बोलले, आता आम्ही र काय निवडणुका लढवणार ? आमचा वय झालं आहे , आणि तस बोलशील तर मी एकदा सरपंच झालोय बा, सोम्या तुझी इच्छा राहिली आहे, माझ्या बरोबर हरला होतास निडणुकित ,
आता उभा रहा, मी तुझ्या विरोधात नाय , तुला पाठिंबा देतो आता 😃
नंतर परत बोलले, नको-नको तू मधिच मेला- बिलास तर परत निवडणूक लागायची, सरकारला परत खर्च नको.
मेलास तू माझ्या मरनावर का आहेस , तुझ १२ व्या च लाडू खाल्ल्या शिवाय मी जाणार नाय, आणि तसा पण तू bonus चा आयुष्य जगतो आहे, जय तर निवडणुकीच्या वेळेस खाश्या च्या हातून मेला असतात, तुझा अबू खाश्याला भिडला म्हणून तु वाचलास, सोम्या बाबा नी पलटवार केला 😃
थोड अजून त्यांच्याबरोबर बोललो तेव्हा समजलं की हे ३५-४० वर्षी एक मेकानच्या विरोधात निवडणुका लढले आहेत, निडणुकांपूर्वी चे खास मित्र समोरा समोर आले, मनात गैरसमज निर्माण झाला आणि बघता-बघता, राजकारण तापलं, संघर्ष शिगेला पोचला, बालपणीचे लंगोटी मित्र दुभागले गेले, अबू एकाच्या बाजूंनी आणि खाश्या दुसऱ्याच्या, परिनामी पूर्ण गाव ढवळून निघाल, काहीच्या घरात भावंडं एक मेकात बोलेनाशी झाली. कारण काय तर गैरसमज आणि त्यामुळे दूषित झालेला राजकारण.
अटी-तटी ची लढत झाली, त्यात कस बस सुभान बाबानच पॅनल निवडून आला आणि बाबा सरपंच झाले,
सुभान बाबा बोलले, निवडून आल्यावर खरी भीती वाटत होती, कारण गाठीशी कसला अनुभव नव्हता त्यात हा सोम्या जोरात निडणुक लढउन सुद्धा हरलेला, बर बर्यापिकी लोक त्याच्याही पाठीशी उभी होती, बोललो आता काय आपला खर नाही ही सर्व लोक आपल्याला वेळोवेळी जाब विचारणार, निडणुकित केल्याल्या आश्वासनांचा पाठ पुरावा करणार.
पण मी वाचलो, येवढ्या जोश मध्ये निडणुक लढणारे आणि आम्हा दोघांच्या तितक्याच जोशाने पाठीशी असणार गाव, आम्ही काय काम केलं ?, किंव्हा अजून काय काम करणार ? आश्वासन पूर्ण करणार की नाही, असा एकानिही सवाल जवाब पाच वर्षात केला नाही.
बाबा म्हणाले त्यातल्या त्यात आम्हीही काही कामे पूर्ण केली, काही काम पुर्ण झाली नाहीत पण प्रामाणिक प्रयत्न मात्र केला होता.
शेवटी २ घे ही बोलले , मनात निर्माण झालेलं कटुता विसरण्या साठी पुढील १०-१५ वर्षी गेली आणि पुन्हा आम्ही दोस्त झालो 😊
असो शेवट गोड, तर सर्वच गोड 😊
टीप - वरील लेख हा काल्पनिक आहे, त्याच्या वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही आहे, जर चुकून सबंध अढळल्यास तो केवळ एक योग - योग मानावा 🙏
फोटो - नेटसाभार
#वाटसरू
#काल्पनिक
No comments:
Post a Comment